कोणतेही कार्ड नसेल तरीसुद्धा रुग्णालयात मिळणार मोफत उपचार-Free hospital treatment
कोणतही कार्ड किंवा कोणत्याही योजनेत जर तुम्ही बसत नसाल तरी सुद्धा तुम्हाला आता मोफत रुग्णालयात उपचार मिळणार आहे हो तुम्ही खर ऐकले आहे रोज अनेक मृत्यू फक्त पैशांमुळे होतात उपचाराला पैसे नसल्यामुळे अनेक जण आपला जीव गमावून बसतात अशा मध्ये पैसे नसले तरी काही अशा सरकारी योजना आहे की त्या योजना वापरून तुम्हाला रुग्णालयात मोफत उपचार मिळत असतात परंतु वय कारणास्तव तुम्हीच जर या योजनांचा भाग बनू शकले नाही तरीसुद्धा तुम्हाला आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण तुम्ही जर कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकले नाही तरीसुद्धा तुम्हाला मोफत उपचार सरकार देत असते ही गोष्ट अनेकांना माहिती नाही ती गोष्ट आपणास बघणार आहोत
तर भारत सरकारने अनेक हेल्थ बीमा योजना काढलेले आहे त्या योजना खालील प्रमाणे आहे
१. आयुष्यमान भारत योजना
आयुष्यमान भारत ही राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना आहे जी 10 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना कवर करते दुय्यम आणि तृतीयक काळजी हॉस्पिटललायझेशन साठी प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे कव्हरेज हे या योजनेअंतर्गत दिले जाते या योजनेचे फायदे देशभरात पोर्टलवर आहेत आणि योजनेअंतर्गत समाविष्ट लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही सार्वजनिक खाजगी पॅनल मधील रुग्णालयांमधून लाभ घेण्याची परवानगी दिली जात असते आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभिनयात परिभाषिक लाभ कवच देत असते. प्रतिक कुटुंब ही योजना पाच लाखांचं पॅकेज देत असते म्हणजे तुमच्या कुटुंबात जर कोणी आजारी पडलं तर त्याला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार संबंधित रुग्णालयात देण्यात येत असतात अशी ही आयुष्यमान भारत योजना आहे
२. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दोन जुलै 2012 पासून प्रायोगिक तत्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू केली आणि नंतर ही योजना 21 नोव्हेंबर 2013 पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आले. सदर महत्वकांशी योजना सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आली नंतर वेळोवेळी इतर लाभार्थी गट त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून भारत सरकार द्वारे लागू करण्यात आली या योजनेत समाविष्ट केलेली कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागासाठी सामाजिक आर्थिक जनगणना 2011 च्या वंचित आणि व्यवसायिक निकषांवर आधारित होती ही योजना 2018 ते 2020 या दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितपणे राबवण्यात आली. सदर योजने करता येणाऱ्या खर्चामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा हिस्सा 60 40 च्या प्रमाणात आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारने दिनांक 28 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व कुटुंबासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि चालू योजनेची व्याप्ती वाढवली त्यानुसार दिनांक 01 जुलै 2024 पासून वास्तविक कार्यक्षेत्रासह एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे या योजनेत महाराष्ट्रातील सर्व लोकसंख्या समाविष्ट आहे ही योजना रुग्णालयांद्वारे रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या आजारासाठी रुग्णालयात दाखवण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोकर ही दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करते ही योजना पूर्णपणे हमी तत्वावर राबविण्यात येत आहे
आता जर काही कारणास्तव तुम्ही वरील योजनांमध्ये बसत नसाल किंवा तुम्हाला जर रुग्णालयात या योजनांमुळे मोफत उपचार मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी मधून मोफत उपचार घेऊ शकतात
मुख्यमंत्री सहायता निधी
1.हृदयरोग
2.मेंदू रोग
3.नवजात बालके
4.मूत्रपिंड प्रत्यारोपण
5.यकृत प्रत्यारोपण
6.कर्करोग
7.अपघात
8.डायलिसिस
9.हृदयी प्रत्यारोपण
या गंभीर आजारांसाठी पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जात असते
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम धर्मादाय रुग्णालय यामध्ये लाभार्थी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रायोजनामार्फत उपलब्ध समिती निधीचा वापर व्हावा म्हणून उपयुक्त योजनांचा लाभ मिळून शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून लाभ देण्यात येत असतो
तुम्ही तुमच्या जवळच्या कम्प्युटर कॅफेमध्ये जाऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे कागदपत्र लागणार
अर्ज
वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक
तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला
रुग्णाचे आधार कार्ड
रुग्णाचे रेशन कार्ड
संबंधित आजाराची रिपोर्ट असणे आवश्यक
रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाचे संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी
अपघात असल्यास एफ आय आर किंवा एमएलसी असणे आवश्यक
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कोण कोण पात्र आहे
जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार पेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात
तुम्हालाही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा